x account
मनोरंजन

Emmys 2024 : शोगुनची 'बाजी', 'या' जपानी अभिनेत्याने घडवला इतिहास

'Shogun's Hiroyuki Sanada ने ड्रामा सीरीजमध्ये पहिला जपानी अभिनेता म्हणून घडवला इतिहास

स्वालिया न. शिकलगार

लॉस एंजेलिस (यूएस) : एमी ॲवॉर्ड्स २०२४ मध्ये 'शोगुन'च्या नावाचा उद्धोष झाला. 'शोगुन' आणि 'द बियर' चे नाव सर्वात पुढे राहिले. या चित्रपटांनी अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. आता विजेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी समोर आली आहे.

७६ व्या प्राईम टाईम एमी ॲवॉर्ड्स २०२४ च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. रविवारी, लॉस एंजिल्समध्ये घोषणा करण्यात आली आहे. 'शोगुन', 'द बियर' आणि 'बेबी रेंडीयर'ने बाजी मारली. जेरेमी एलन व्हाईटने कॉमेडी सीरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला. एन्ना सवाईला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ती देखील शोगुनमध्ये दिसली होती.

विजेत्यांची यादी -

बेस्ट ड्रामा- शोगुन

बेस्ट ॲक्टर ड्रामा सीरीज- हिरोयुकी सनाडा (शोगुनसाठी)

बेस्ट ॲक्ट्रेस ड्रामा सीरीज- एन्ना सवाई (शोगुनसाठी)

सपोर्टिंग ॲक्टर ड्रामा सीरीज- बिल्ली क्रुडुप (द मॉर्निंग शोसाठी)

सपोर्टिंग ॲक्ट्रेस ड्रामा सीरीज- एलिजाबेथ डेबिकि (द क्राऊनसाठी)

गेस्ट ॲक्टर ड्रामा सीरीज- नेस्टर कार्बोनेल (शोगुनसाठी)

गेस्ट एक्ट्रेस ड्रामा सीरीज- आयकेला कोल (मिस्टर अँड मिसेज स्मिथ)

बेस्ट डायरेक्शन ड्रामा सीरीज- शोगुन (डायरेक्टर फ्रेड्रिक ईओ टोय)

बेस्ट रायटिंग ड्रामा सीरीज- स्लो हॉरसेज (रायटर- विल स्मिथ)

बेस्ट लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- बेबी रेंडीयर (नेटफ्लिक्स)

बेस्ट टीव्ही मुव्ही- क्विज लेजी (हूलू)

बेस्ट ॲक्टर लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- रिचर्ड गाद्द (बेबी रेंडीयरसाठी)

बेस्ट ॲक्ट्रेस लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- जोडी फॉस्टर (ट्रू डिटेक्टिव्ह नाईट कंपनीसाठी)

बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- लमोरन मोरिस (फर्गोसाठी)

बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- जेस्सिका गन्निंग (बेबी रेंडीयरसाठी)

बेस्ट डायरेक्शन लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- रिप्ले (नेटफ्लिक्स) (डायरेक्टर- स्टीवेन जीलियन)

बेस्ट रायटिंग लिमिटेड/अँथोलॉजी सीरीज- बेबी रेंडीयर (नेटफ्लिक्स) (रायटर- रिचर्ड गाद्द)

बेस्ट कॉमेडी सीरीज- हॅक

लीड ॲक्टर कॉमेडी सीरीज- जैरेमी एलन व्हाईट (द बीयरसाठी)

लीड ॲक्ट्रेस कॉमेडी सीरीज- जीन स्मार्ट (हॅक्ससाठी)

सपोर्टिंग ॲक्टर कॉमेडी सीरीज- इबन मॉस बचराच (द बीयरसाठी)

सपोर्टिंग ॲक्ट्रेस कॉमेडी सीरीज- लिजा कोलन जयास (द बीयरसाठी)

गेस्ट ॲक्टर कॉमेडी सीरीज- जॉन बर्नथाल (द बीयरसाठी)

गेस्ट ॲक्ट्रेस कॉमेडी सीरीज- जेमी ली कर्टिस (द बीयरसाठी)

बेस्ट डायरेक्शन मुव्ही कॉमेडी सीरीज- द बीयर (डायरेक्टर- क्रिस्टोफर स्टोरर)

बेस्ट रायटिंग कॉमेडी सीरीज- हॅक (रायटर- लुसिया अनिलो, पॉल डब्लू, जेन स्टेटस्की)

बेस्ट होस्ट (रिॲलिटी शो)- एलन कम्मिंग (द ट्रेटर्ससाठी)

बेस्ट होस्ट (गेम शो)- पॅट सजाक (वील ऑफ फॉर्च्यूनसाठी)

बेस्ट रिॲलिटी प्रोग्रॅम - शार्क टँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT