हॅरी पॉटर फेम टिमोथी स्पालला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार  instagram
मनोरंजन

एमी ॲवॉर्ड्स २०२४ | एमी हॅरी पॉटर फेम टिमोथी स्पाल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

International Emmy Awards 2024 : हॅरी पॉटर फेम टिमोथी स्पालला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - २५ नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल एमी ॲवॉर्ड्स २०२४ च्या विजेत्यांची यादी जारी केली आहे. भारतात या इवेंटला २६ नोव्हेंबर रोजी सकाळी लाईव्ह टेलिकास्ट केले. या ॲवॉर्ड फंक्शनमध्ये भारताकडून सर्वोत्कृष्ट ड्रामा कॅटेगरीमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला स्टारर वेब सीरीज 'द नाईट मॅनेजर'ला नॉमिनेट केलं गेलं होतं. ५२ व्या इंटरनॅशनल एमी ॲवॉर्डमध्ये २१ देशांचे एकूण ५६ कलाकार नॉमिनेट केले गेले. यावेळी ॲवॉर्ड १४ वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल एमी ॲवॉर्ड्स २०२४ चे आयोजन केले गेले. यामध्ये हिंदी चित्रपट अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दासने होस्ट केलं. हा कार्यक्रम इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेज (IATAS) कडून सादर करण्यात येतो. यावर्षाचा सोहळा खूप खास आहे कारण पहिल्यांदा असे झाले की, एमी ॲवॉर्डला एका भारतीयाने होस्ट केलं आहे. हा ॲवॉर्ड जगभरात एक प्रसिद्ध सोहळ्यांपैकी एक आहे. यावेळी न्यूयॉर्क हिल्टन मिडटाऊनमध्ये आयोजन करण्यात आले होते.

इंटरनॅशनल एमी ॲवॉर्ड्स २०२४ विजेत्यांची यादी -

बेस्ट ॲक्ट्रेस – ऑकबाब-चुटिमोन चुएंगचारोएनसुकिंग (हंगर)

बेस्ट ॲक्टर – टिमोथी स्पाल (द सिक्स्थ कमांडेंट)

आर्ट्स प्रोग्रामिंग – पियानोफोर्टे

कॉमेडी अॅवॉर्ड – डिवीजन पलेर्मो

रेस्टोरेंट मिसवर्स्टैंड – सीजन 2- नॉन-स्क्रिप्टेडट एंटरटेनमेंट अवॉर्ड

किड्स: फैक्चुअल एंड एंटरटेनमेंट अवॉर्ड – ला विदा सेक्रेटा डे तू मेंटे (द सीक्रेट लाइफ ऑफ योर माइंड)

किड्स लाइव-एक्शन – एन अफ ड्रेंगने (वन ऑफ द बॉयज)

किड्स: एनीमेशन अॅवॉर्ड – टॅबी मॅक टॅट

टीवी मूवी/मिनी-सीरीज अवॉर्ड – लीब्स काइंड (डियर चाइल्ड)

ड्रामा सीरीज अॅवॉर्ड – लेस गौटेस डी डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड)

नॉन स्क्रिप्टेड ड्रामा सीरीज अॅवॉर्ड – रेस्टोरेंट मिसवरस्टैंड – सीजन 2

स्पोर्ट्स डॉक्यूमेंट्री – ब्रॉन: द इम्पॉसिबल फॉर्मूला 1

शॉर्ट-फॉर्म सीरीज – पंट डे नो रिटोर्न

मिनी-सीरीज – लिबेस काइंड (डियर चाइल्ड)

टेलीनोवेला अवॉर्ड – ला प्रोमेसा (द वॉव)

डॉक्युमेंट्री अवॉर्ड – ओटो बॅक्सटर: नॉट ए …. हॉरर स्टोरी

अॅवॉर्ड से चूक गई ‘द नाईट मॅनेजर’

होस्ट वीर दासला २०२३ मध्ये एमी ॲवॉर्ड मिळालं होतं. यावर्षी अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला स्टारर वेब सीरीज ‘द नाईट मॅनेजर’ देखील बेस्ट ड्रामा कॅटेगरीमध्ये नॉमिनेट होतं. पण फ्रेंच ड्रामा सीरीज लेस गॉटेस डी डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड) ला हा ॲवॉर्ड मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT