मनोरंजन

Ekda Yeun Tar Bagha चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपण बघतो. असंच एक जोरदार गीत आगामी 'एकदा येऊन तर बघा' या धमाल चित्रपटातून आपल्या भेटीला आलं आहे. (Ekda Yeun Tar Bagha)

संबंधित बातम्या –

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात 'आली आली गं भागाबाई' हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादर केलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे. हे गीत रोहन प्रधान यांनी गायलं आहे. मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहन यांचं संगीत लाभलं आहे. या गीतातून चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज पहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. (एकदा येऊन तर बघा)

२४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येतोतय. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने,प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

SCROLL FOR NEXT