पुढारी ऑनलाईन डेस्क - महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. ‘एक राधा एक मीरा’ या म्युझिकल लव्ह स्टोरीचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून ७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. (Ek Raadha Ek Meera Movie)
अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटाची निर्मिती अविनाशकुमार प्रभाकर आहाले यांनी केलीय. त्यात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पथक, मेधा मांजरेकर आदींच्या भूमिका आहेत. सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांचे पार्श्वगायन आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. (Ek Raadha Ek Meera Movie)
'अंतरीचा सुर हलगीचा उमटला, जीव माझा तुझ्यासवे अलगद निसटला...' असे बोल आहेत. "राधा असो की मीरा, सगळ्यांचे सेम असते?", असा एक प्रश्न पोस्टरमध्ये स्क्रीनवर उमटतो. "एक राधा, त्याची अबोल प्रीत. एक मीरा, त्याचे श्यामल गीत. प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर, म्युझिकल लव्ह स्टोरी," अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.