ड्रग्ज नेटवर्कमध्ये श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीचे नाव? Pudhari
मनोरंजन

Drug Syndicate: दाऊदशी जोडलेल्या 252 कोटीच्या ड्रग्ज नेटवर्कमध्ये श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीचे नाव?

अजूनतरी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत नाही

अमृता चौगुले

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कुख्यात गुन्हेगार दाऊद ईब्राहीमशी जोडलेल्या एका मोठ्या ड्रग सिंडीकेटला उजेडात आणले आहे. विशेष म्हणजे यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे नावही समोर येताना दिसते आहे. अजूनतरी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत नाही. या यादीत रॅपर लोका, श्रद्धा कपूर, ओरी, दिग्दर्शक अब्बास मस्तान यांचे नाव समाविष्ट आहे. याशिवाय जिशान सिद्दीकी याचेही नाव या यादीत आहे. (Latest Entertainment News)

हे सिंडीकेट ड्रग माफिया सलीम डोलामार्फत चालवले जात आहे. सलीम डोलाला दाऊदचा सहकारी मानला जातो. हे नेटवर्क तो दुबईहून चालवत असे. तो देशातील अनेक राज्यात मेफेड्रॉनचा पुरवठा करत असे. सलीमच्या मुलाला ताहिर डोलाला ऑगस्टमध्ये युएईमधून प्रत्यार्पित केले होते. त्यानेच ही माहिती पोलिसांना दिल्याचे समोर येत होते. या रॅकेटची एकूण किंमत 252 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ताहिरने सांगितले की त्याने अनेकदा ड्रग पार्टीचे आयोजन केले आहे. तसेच इतर पार्टीमध्ये ड्रगही पुरवले होते. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये म्हणले आहे की, त्याने अलीशा पारकर, नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, जिशान सिद्दीकी, ओरी उर्फ ​​ओरहान, अब्बास मस्तान, लोका यांच्यासोबत अनेकदा ड्रग पार्टीचे आयोजन केले आहे. अर्थात या प्रकरणाचा अजूनही तपास सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT