मनोरंजन

‘द़ृश्यम-3’ लवकरच येणार

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी 2013 मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट 'द़ृश्यम'ची निर्मिती केली होती. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाला आणि त्यात अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहिट ठरले आहेत. आता या चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबद्दल माहिती समोर आली आहे. 'द़ृश्यम' आणि 'द़ृश्यम- 2' या चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती मिळाली होती. दाक्षिणात्य दृश्यमच्या निर्मात्यांनी तिसर्‍या भागासाठी हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांशी करार केला आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि या चित्रपटाच्या लेखक टीमने द़ृष्यम- 3साठी कथेतील टि्वस्ट्स तयार केले आहेत. 'द़ृश्यम'ची हिंदी आणि मल्याळम टीम एकाच वेळी दोन्ही चित्रपटांचे शूटिंग करण्यासाठी आणि एकाच तारखेला संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

SCROLL FOR NEXT