पुढारी ऑनलाईन डेस्क - पॉडकास्टर आणि यु-ट्युबर रणवीर अल्लाहबादिया बद्दल एका डॉक्टर तरुणीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही तरुणी रणवीर अल्लाहबादियाची फॅन आहे. तिने आपले प्रेम सार्वजनिकपणे व्यक्त केल्या असून तिने काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही तरुणी स्वत:ला पशु डॉक्टर आणि अध्यात्मिकतेशी संबंधित कंटेंट क्रिएटर असल्याचे सांगते.
रोहिणी आरजू असे या तरुणीचे नाव सांगितले जात आहे. या तरुणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरसाठी आपले प्रेम व्यक्त करणारे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने रणवीरची पूजा करताना आणि करवा चौथचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती वधूप्रमाणे नटलेली दिसत असून रणवीरच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे.
इतकचं नाही तर तिने आपल्या शरीरावर टॅटूदेखील काढले आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये रोहिणीने वधूची मेहंदी दाखवत 'रणवीर' असं लिहिलं होतं.
रोहिणी आरजूने एका पोस्टमध्ये लिहिलं, 'अनेक लोक माझी खिल्ली उडवू शकतात आणि मला वेडी म्हणून शकतात, पण मी तुझ्यावर प्रेम करते रणवीर अल्लाहबादिया....' या पोस्टमध्ये तिने रणवीरला 'स्वामी' आणि 'सर्व काही' म्हटलं.
आणखी एक फोटो पोस्ट शेअर करत तिने आपला एक फोटो शेअर केला आहे. ती रणवीरचा फोटो जवळ घेऊन झोपलेली दिसते. या फोटोला 'जहां रणवीर, वहां रोहिणी', अशी कॅप्शनही लिहिलेली दिसते.