फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 एका बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या सिनेमाच्या यापूर्वीच्या भागांनीही चांगले यश मिळवले आहे. एका रिपोर्टमध्ये असे समोर येत आहे की या सिनेमात आता डॉन आणि डॉन 2 मधील मुख्य अभिनेता शाहरुख खान आणि बिग बी अमिताभ बच्चन हे देखील दिसणार आहेत. जर असे घडले तर डॉन 3 मध्ये तिन्ही पिढ्यांचा संगम होणार आहे. (Latest Entertainemt News)
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अमिताभ बच्चन आणि शाहरुख या प्रस्तावावर विचार करत असल्याचे समोर येत आहे. जर या दोघांचे येणे कन्फर्म झाले तर हे तिघेही पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करत आहेत.
डॉन फ्रँचाईजी ही बॉलीवुडच्या यशस्वी सिनेमांपैकी एक आहे. 1978 मध्ये चंद्रा बरोट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. यानंतर अनेक दशकानंतर शाहरुखने या सिनेमात आपल्या हटके अंदाजात रंग भरला. डॉन आणि डॉन 2 च्या माध्यामातून शाहरुखचे नाव या यशस्वी फ्रँचाईजीसोबत जोडले गेले आहे.
आता रणवीर सिंगच्या मुख्य भूमिकेत डॉन 3 ची चर्चा जोरात आहे.
या सिनेमात यापूर्वी विक्रांत मेस्सी दिसणार होता. पण त्याने या सिनेमातून काढता पाय घेतला. त्याच्या जागी आता करणवीर मेहरा हा कलाकार दिसणार आहे. या सिनेमात अभिनेत्री कृती सेनॉन दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार असल्याचे समोर येत आहे. हा सिनेमा डिसेंबर 2026 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.