पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत नुकतेच पार्थ आणि काव्याचं लग्न सोहळा पार पडला आहे. पार्थ देशमुखची भूमिका अभिनेता विजय आंदळकरने आणि काव्याची भूमिका मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साकारली आहे. लग्नानंतर दोघांनी कोल्हापूरातील आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे. त्याच्यासोबत काही मालिकेतील टिमदेखील दिसत आहे.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकतेच तिच्या इन्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ज्ञानदा कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात असून देवीसाठी नारळ आणि ओठीचे सामान घेताना दिसतेय. यानंतर दोघांनी देवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी ज्ञानदा स्पिच-ब्राऊन कलरच्या साडीत आणि पार्थ व्हाईट सेरवानीत दिसला. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'पार्थ आणि काव्याने घेतलं कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन..' असे लिहिले आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत खरे तर नंदिनी आणि पार्थचं लग्न होणार असतं. मात्र, नंदिनीला लग्नातून पळवून नेलं जातं आणि नंदिनीच्या जागी काव्याला पार्थशी लग्न करावं लागतं. याच दरम्यान गावकऱ्यांच्या म्हणणानुसार, नंदिनीला पार्थचा मधला भाऊ जीवासोबत लग्न करावं लागते. असं दाखवण्यात आलं आहे.