'द सिक्रेट ऑफ द शिलेदार' सीरीज ३१ जानेवारी २०२५ पासून डिस्नी+ हॉटस्‍टारवर पाहता येईल Instagram
मनोरंजन

डिस्नी+ हॉटस्‍टार नवी वेब सीरीज 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'

The Secret Of The Shiledars | छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वारसाचे संरक्षण करण्‍याच्‍या प्रवासावर आधारीत सीरीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शौर्य, निष्‍ठा आणि कर्तव्‍याप्रती अविरत समर्पिततेची गाथा डिस्नी+ हॉटस्‍टार सीरीज 'द सिक्रेट ऑफ शिलेदार' घेऊन येत आहे. दशमी क्रिएशन्‍स एलएलपी बॅनरअंतर्गत चित्रपट 'मुंजा'मधून प्रसिद्धी मिळालेले आदित्‍य सरपोतदार यांचे दिग्‍दर्शन आणि नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. या सीरीजमध्‍ये राजीव खंडेलवालसह सई ताम्‍हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत. ही सीरीज ३१ जानेवारी २०२५ पासून डिस्नी+ हॉटस्‍टारवर पाहता येईल.

या सीरीजचे दिग्‍दर्शक आदित्य सरपोतदार म्‍हणाले, ''लहानाचा मोठा होत असताना माझे नेहमी साहसी व ऐतिहासिक कथांनी लक्ष वेधून घेतले आहे, माझ्या मनात अशा कथांबाबत नेहमी उत्‍सुकता असायची. अशाच उत्‍सुकतेमधून 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'ची निर्मिती झाली आहे. संरक्षक असलेल्या 'शिलेदार'ची संकल्‍पना यापूर्वी सादर करण्‍यात आलेली नाही, ज्‍यामुळे ही सिरीज रोचक असणार आहे. मला राजीव खंडेलवालसोबत हा प्रवास सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. त्‍याने या सीरीजसाठी स्‍वत:चे तन-मन झोकून दिले आहे. मला खात्री आहे की, पडद्यावर ती मेहनत दिसून येईल. डिस्नी+ हॉटस्‍टारवर प्रेक्षकांचे प्रेम व पाठिंबा मिळण्‍याची मी आशा करतो.''

अभिनेता राजीव खंडेलवाल म्‍हणाले, ''माझा विश्‍वास आहे की, इतर कोणी नाही तर 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'ने मला निवडले. अशी वेगळी व बहुआयामी भूमिका साकारण्‍याबाबत माझ्या मनात शंका होती, पण आदित्‍य यांनी त्‍यांच्या सूक्ष्मदर्शी दृष्टिकोनासह सर्वकाही सोपे व सुरळीत केले.''

अभिनेत्री सई ताम्‍हणकर म्‍हणाली, ''मला मराठ्यांची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सादर करणाऱ्या कथानकाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. मी बालपणापासून अनेक कथा ऐकत आले आहे आणि प्रत्‍येक वेळी प्रत्‍येक कथा ऐकून मला अभिमान वाटतो.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT