Disha Vakani Father Bhim Vakani passes away  pudhari
मनोरंजन

Disha Vakani Father Bhim Vakani dies|'तारक मेहता...' फेम दिशा वकानीच्या वडिलांचे निधन; मालिकेत साकारली होती ही महत्त्वाची भूमिका!

Disha Vakani Father Bhim Vakani dies | अभिनेत्री दिशा वकानीला पितृशोक, भीम वकानी यांनी तारक मेहता मध्ये केला होता अभिनय

स्वालिया न. शिकलगार

मराठी मनोरंजन विश्वासाठी आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. दिशा वकानीचे वडील भीम वकानी यांचे निधन झाले असून, त्यांनी मालिकेतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Disha Vakani Father Bhim Vakani is no more

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेत्री दिशा वकानीचे वडील भीम वकानी यांचे निधन झाले. या मालिकेत भीम वकानी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आज मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चे निर्माते असित कुमार मोदी यांनी वृत्ताची पुष्टी केलीय.

त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये ते अनेक एपिसोडमध्ये दिसले होते. असित कुमार मोदी यांनी या गोष्टीची माहिती देत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

असित कुमार मोदी काय म्हणाले?

असित कुमार मोदी म्हणाले की, ‘ते आजारी नव्हते. परंतु, सकाळी समजलं की, त्यांचं निधन झालं. भीम वकानी एक उत्तम पेंटर, अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी ‘लगान’ चित्रपटातही काम केलं होतं.’

असित कुमार पुढे म्हणाले की, भीम वकानी यांचे आपल्या मुलीच्या (दिशा वकानी) करिअरमध्ये मोठं योगदान आहे. आमचं नातं कौटुंबिक होतं. ते जेव्हा मुंबईत यायचे, तेव्हा माझ्या घरी नक्की यायचे. आम्ही सगळे एकत्र वेळ घालवायचो. असं वाटतं की, घरातील एखादा सदस्यच निघून गेला आहे.’

त्यांनी ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान सारख्या सुपरस्टार्स सोबत स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटांशिवाय, गुजराती थिएटर आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्येही काम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT