Disha Patani dating news instagram
मनोरंजन

Disha Patani dating | दिशा पटानीचा पंजाबी गायकाच्या हातात हात, मिस्ट्री मॅनने लपवला चेहरा, डेटिंगच्या चर्चांना उधाण

Disha Patani dating | दिशा पटानीचा पंजाबी गायकाच्या हातात हात, मिस्ट्री मॅनने लपवला चेहरा, नुपूर सॅनॉनच्या लग्नातून व्हिडिओ व्हायरल?

स्वालिया न. शिकलगार

दिशा पटानी एका पंजाबी गायकासोबत हातात हात घालून फिरताना दिसल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिस्ट्री मॅनने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या नात्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअपनंतर दिशाचं नाव अनेकदा जोडण्यात आलं असलं तरी तिने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Disha Patani dating news with punjabi singer

टायगर श्रॉफशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचे नाव आता एका पंजाबी गायकाशी जोडले जात आहे. कारण होतं-नुपूर सेनॉनचं लग्न. अशी चर्चा आहे की, दिशा पटानी पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. दिशा पटानीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पंजाबी गायकाच्या जवळ उभी असल्याचे दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिशा पटानी गायक तलविंदरला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. तलविंदर कधीही सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा दाखवत नाही आणि नेहमीच मास्क घालून असतो. आता दिशा पटानी आणि गायक तलविंदर डेट करत आहेत का? असा प्रश्न फॅन्सना पडला आहे.

या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिशा पटानीची बहीण नुपूरच्या लग्नातील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये दोघेही हात धरून एकमेकांशी बोलत आहेत. दिशाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दोघेही डेट करत आहेत, असा तर्क लावला जात आहे.

प्रसिद्ध गायक तलविंदर नेहमीच मास्क घालतो. तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा दाखवण्याचे टाळतो. पण व्हायरल व्हिडिओमध्ये तलविंदरचा चेहरा दिसतो. तोदेखील हसताना दिसत आङे. शेजारी हातात हात घालून दिशा पटानी उभी आहे. ती बोलताना हसत आहे.

कोण आहे तलविंदर?

गायक तलविंदरचे पूर्ण नाव तलविंदर सिंग सिद्धू असून तो प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. तो हिप-हॉप आणि सिंथ-पॉप गाण्यांसाठी ओळखला जातो. तलविंदरचा पहिला अल्बम, मिसफिट मध्ये रिलीज झाला होता. पुढे त्याने हसीन, युवर आयज, पल पल, तू ही लोकप्रिय गाणी गायली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT