‘O Romeo’ चित्रपटातील ‘आशिकों की कॉलोनी’ या नव्या गाण्यात शाहीद कपूर आणि दिशा पटानीची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. ग्लॅमरस लूक, रोमँटिक मूड आणि दमदार डान्स मूव्ह्समुळे हे गाणं सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा रोमँटिक म्युझिकचा धडाका पाहायला मिळतोय. ओ रोमियो चित्रपटातील 'आशिकों की कॉलोनी' गाणे रिलीज झाले आहे. शाहिद कपूर आणि दिशा पटानी यांची फ्रेश केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळतेय. ‘O Romeo’ या आगामी चित्रपटातील हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
या गाण्यात शाहीद कपूरचा चार्म आणि दिशा पटानीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो. दोघांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.दिशा पटानी नेहमीप्रमाणे तिच्या फिटनेस, ग्रेस आणि डान्स मूव्ह्सने लक्ष वेधून घेत आहे. तर शाहीद कपूरचा सहज, रोमँटिक अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांना आवडताना दिसतोय. या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसत आहे.
साजिद नाडियाडवालाचा आगामी चित्रपट 'ओ रोमियो'चा ट्रेलरदेखील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता. आता चित्रपटातील गाणे देखील व्हायरल होत आहे. 'आशिकों की कॉलोनी' हे दुसरे गाणे आहे. फुल-ऑन डान्स नंबर असून दिशा पटानीवर चित्रीत करण्यात आले आहे. नव्वदच्या दशकातील रंगीन बॉलीवूड वाईब्स असणाऱ्या या गाण्याला मॉडर्न संगीत दिले आहे. सूर जुनेच असले तरी मॉडर्न स्टाईल गाणे फुल मूड ऑन फ्रेश करणारे आहे.
विशाल भारद्वाज यांचे संगीत, गुलजार यांचे बोल, मधुबंती बागची, जावेद अली यांचा जादूई आवाज आणि शाहिद–दिशाची फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळते.
'ओ रोमियो'चे दिग्दर्शन निर्माते विशाल भारद्वाज यांनी कले आहे. शाहिद कपूर, तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून नाना पाटेकर, फरीदा जलाल, विक्रांत मेसी, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.