मनोरंजन

Disha Patani : केटीना चित्रपटातून दिशाचा पत्ता कट, एकताने घेतला निर्णय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकता कपूरच्या आगामी 'केटीना' या चित्रपटातून दिशा पटानीचा पत्ता कट झाला आहे. एकताने (Disha Patani ) दिशाला तिच्या अनप्रोफेशनल बिहेवियर वागणुकीमुळे तिच्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे वृत्त आहे. एकता कपूरचा हा चित्रपट तिच्या आयुष्यावर आधारित आहे. आता एकता तिच्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, तारा सुतारिया आणि श्रद्धा कपूर यांच्याशी संपर्क केले जात आहे. (Disha Patani)

बालाजी मोशन पिक्चर्स आणि दिशा यांच्यात वाद

एकता कपूर तिच्या जीवनावर आधारित केटीना चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटासाठी तिने दिशा पटानीला कास्ट केले होते. दिशाने चित्रपटाचे काही सीन देखील शूट केले होते. पण नुकत्याच समोर आलेल्या वृत्तांनुसार एकताची प्रोडक्शन कंपनी बालाजी मोशन पिक्चर्समधील काही सदस्य आणि दिशा पटानी यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला होता आणि त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे एकतासमोर दिशाला तिच्या चित्रपटातून काढून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.

चित्रपटातील दृश्ये पुन्हा शूट होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बालाजी प्रॉडक्शनने दिशाची रिप्लेसमेंट म्हणून तारा सुतारिया आणि श्रद्धा कपूरला शॉर्टलिस्ट केले आहे. या दोघींपैकी एकाला एकताच्या चित्रपटासाठी कास्ट केले जाईल. एकताने या चित्रपटावर बरीच गुंतवणूक केली असल्याने दिशाने शूट केलेले सीन पुन्हा शूट केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

दिशाच्या अलीकडील प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती मोहित सूरीच्या 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात ती जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत दिसली होती. एमएस धोनी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती पण छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

SCROLL FOR NEXT