मनोरंजन

ट्रोल होत असलेल्या सुश्मिताबाबत माजी प्रियकर विक्रम भट बोलला असं काही की सर्वांच्या भुवया उंचावल्या

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतच सुश्मिता सेन आणि ललित मोदीच नातं जाहीर झालं आणि सुश्मिता सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली. अनेकांनी सुश्मिताला ट्रोल केलं तर अनेकांनी तिची बाजू सोशल मीडियावर उचलून धरली आहे. तिची बाजू घेणाऱ्यांमध्ये एका नावाने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

एकीकडे सुश्मितावर संधीसाधूपणाचा आरोप होत असताना तिची बाजू घेणाऱ्यांमध्ये माजी प्रियकर विक्रम भटचं नाव चर्चेत आहे. विक्रम म्हणतात, ' सुश्मिता अशी व्यक्ती नक्कीच नाही जी बँक बॅलेन्स पाहून कुणाच्या प्रेमात पडेल.' या दरम्यान 'गुलाम' सिनेमाचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

ते म्हणतात, 'गुलाम' सिनेमाच्या दिग्दर्शनावेळी माझ्याकडे एक पैसाही शिल्लक नव्हता. पण सुश्मिताने कोणताही किंतु मनात न ठेवता मला अमेरिकेला नेलच पण माझं पदार्पण विशेष होईल याची काळजीही घेतली. सुश्मिता ही स्वत:च्या तत्वांवर जगणारी मुलगी आहे. त्यामुळेच यशासाठीही तिने कधीच तडजोड केली नाही.

त्यामुळे पैशासाठी ती कोणत्याही नात्यात असेन हा तिच्यावर केला जाणारा आरोप निराधार आहे. 1996 मध्ये आलेल्या 'दस्तक' या सिनेमाच्या दरम्यान विक्रम आणि सुश्मिता नात्यात आले. या दरम्यान विक्रमच्या वैवाहिक आयुष्यात वादळ येऊ घातलं होतं. विक्रमच्या संपत आलेल्या वैवाहिक जीवनाला कारणीभूत सुश्मिता असल्याच चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या.

पण सिमी गरेवालच्या शोमध्ये विक्रम यांनी ही बाब खोडून काढली होती. पण 1998 मध्ये सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रमने सहा मजली इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात सुदैवाने त्यांचा जीव वाचला. त्यांनतर एका मुलाखती दरम्यान विक्रम यांनी हा खुलासा केला होता. विक्रमनंतर सुष्मिताला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये तिची वहिनी चारू असोपाची पोस्टही चर्चेत आहे. ' नेहमी मुलींनाच टार्गेट केलं जातं '. अशा शब्दात तिने माजी वहिनी सुष्मिताला सपोर्ट केला आहे. सोशल मीडियावर सुश्मिता आणि चारू एकमेकांना कायमच सपोर्ट करताना दिसतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT