गुणी अभिनेत्री प्रिया मराठे हिची अकाली एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. कॅन्सरशी झुंज देता देता प्रियाची प्राणज्योत मालवली. आजार बळावेपर्यन्त प्रिया मालिका आणि रंगभूमीवर अॅक्टिव होती.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रिया शेवटचे दिसली होती. यासोबतच ती अ परफेक्ट मर्डर या नाटकातही काम करत होती.
प्रियाच्या जाण्याने या नाटकात ती करत असलेली भूमिका कोण साकारणार हे आता समोर आले आहे. प्रियाच्या जागी अभिनेत्री दीप्ती भागवत ही प्रिया साकारत असलेली भूमिका साकारणार आहे.
याशिवाय या नाटकात अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, दीप्ती भागवत, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार देखील आहेत.