Sardaar ji-3 Diljit Dosanjh answered casting of Hania Aamir
मुंबई – पंजाबी संगीत जगतात आणि बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लोकप्रिय गायक-अभिनेता दिलजीत दोसांज गेल्या काही महिन्यांपासून एका चर्चेत अडकला होता. या चर्चेचं कारण होतं- पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर. सरदारजी-३ मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला कास्ट केल्याबद्दल झालेल्या टीकेनंतर दिलजीत दोसांझने काही महिन्यांनंतर मौन सोडले.
पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चित्रपटाचे या चित्रीकरण करण्यात आले होते.
दिलजीत म्हणाला- ''जेव्हा फेब्रुवारीमध्ये माझा चित्रपट ‘सरदार जी-३’ चे शूटिंग सुरु होते, तेव्हा मॅच सुरु होती. त्यानंतर पहलगाममध्ये दु:खद दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी आणि आता देखील, आम्ही नेहमी हीच प्रार्थना करतो की, दहशतवाद्यांना कडक शिक्षा मिळावी. फरक फक्त इतकाच आहे की, आमचा चित्रपट हल्ल्याच्या आधी शूट झाला होती. मॅच हल्ल्यानंतर खेळली गेली. माझ्याकडे अनेक उत्तरे आहेत. पण मी गप्प बसलो. सर्व काही मनात दाबून ठेवलो. कुणी काहीही म्हणो..तुम्हाला ते विष आपल्या आत घेतलं नाही पाहिजे. मी जीवनात हेच शिकलो आहे. यासाठी मी काही बोललो नाही.''
दिलजीतने म्हटले की, ‘नॅशनल मीडियाने मला अँटी नॅशनल बनवले. पण शीख आणि पंजाबी समुदाय कधीही देशाविरोधात जाऊ शकत नाही.’
त्याची एक क्लिप व्हायरल होत आहे. दिलजीत, तिरंग्याला सल्यूट करतो आणि म्हणतो, 'तो माझ्या देशाचा ध्वज आहे. नेहमी त्याचा सन्मान करताना.' त्यानंतर तो प्रेक्षकांची परवानगी मागतो काहीतरी सांगण्यासाठी. तो पंजाबीमध्ये बोलतो की, 'जेव्हा माझा चित्रपट सरदार जी ३ शूट झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिना होता. आणि मॅच खेळले जात आहेत.य