तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जवळपास 17 वर्षे राज्य केले आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक खास बॉन्ड निर्माण झाला आहे. यामालिकेत अनेकदा मानवता, बंधुता आणि एकोपा यावर मेसेज देणारे एपिसोड प्रसारित केले जातात. (Latest Entertainment News)
पण पडद्यामागचे सत्य अनेकदा वेगळे दिसून येते. या मालिकेतील अभिनेत्री अनेकदा प्रोडक्शनवर छळाचे आरोप करतात. तर अनेक कलाकार अचानक मालिका सोडून जातात. आता तर या मालिकेसंदर्भात अजून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे.
तारक मेहता मधील रोशनकौर सोढी साकारणारी जेनीफर मिस्त्री हिने एका मुलाखतीमध्ये एक किस्सा शेयर केला आहे. हा किस्सा आहे मालिकेतील दोन महत्वाच्या व्यक्तींसंदर्भात आहे. त्या आहेत जेठालाल साकारणारे दिलीप जोशी आणि निर्माते असलेले असित मोदी यांच्यात झालेल्या भांडणाचा आहे. या भांडणात दिलीप यांनी असित यांची कॉलर पकडली होती.
या मालिकेचा हाँगकाँग स्पेशल एपिसोड सुरू असतानाचा हा किस्सा आहे. जेनिफर पुढे सांगते, आम्ही सगळे हाँगकाँगमध्ये होतो. त्यावेळी या दोघांची खूप मोठी भांडणे झाली. अगदी सगळ्यांसमोर एकमेकांनवर आरडाओरडा करुण भांडणे झाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही झाले. रागाच्या भरात दिलीप यांनी असित यांची कॉलरही पकडली होती. हे पाहताच आम्ही सगळे आवाक झालो होतो.यानंतरही एकदा असेच भांडण झाले. आम्ही सगळे या भांडणाला वैतागून गेलो होतो. त्यांचे खूप मोठे भांडण झाले होते.’
रोशनकौर साकारणाऱ्या जेनिफरनेही असित मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. जेनिफरने असित यांच्यावर लाज वाटेल असे वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिला मानसिक त्रास दिल्यानंतर हा किस्सा तिने बबिता साकारणाऱ्या मूनमून दत्ताला सांगितला होता. यानंतर असित यांनी जेनिफरवर शेरेबाजी करणे थांबवले होते.