मनोरंजन

dia mirza : दियाने सांगितली ‘ती’ वेदनादायी गोष्ट, प्रेग्नेंसीवेळी रक्तस्त्राव झाला आणि…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ( dia mirza ) अनेक दिवसांपासून चित्रपटापासून दूर असली तरी गेल्या वर्षी ती खूपच चर्चेत आली होती. दियाने पहिला पती साहिल सांघापासून विभक्त होवून बॉयफ्रेंड वैभव रेखीशी विवाह केला. यानंतर तिने लगेचगोंडस बाळाला जन्म दिला. वरील दोन्ही घटनांमुळे गेल्या वर्षी दिया सोशल मीडियावर प्रकाश झोतात आली होती.

दियाने ( dia mirza ) नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या प्रेग्नेंसीबाबत खुलासे करताना तिने प्रेग्नेंसीच्या पाचव्या महिन्यात अॅपेन्डेक्टॉमी आणि त्यानंतर बैक्टीरियल संसर्गामुळे रुग्णालयात वारंवार जावे लागत असल्याचे सांगितले आहे. यावेळी खूपच अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले आहे. याशिवाय तिने प्रेग्नेंसीच्या सहाव्या महिन्यात देखील संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने मृत्यूशी झुंज दिल्‍याचेही सांगितले.

प्रेग्नेंसीवेळी दियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.  अत्यंत कठीण प्रसंगातून दिया आणि तिच्या मुलाला वाचवण्यात यश आल्याचे डॉक्टरांनी म्‍हटलं हाेते.

नुकतेत दियाने आपली सावत्र मुलगी समायरा रेखी हिच्यासोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघीजणी प्रसिद्ध गायक एकॉन याच्या गाण्यावर थिरकत असून दोघीनी एकाच रंगाचा पायजमा घातला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शममध्ये तिने 'जंगली बना. आजाद व्हा. नेहमी एकत्रित डान्स करूयात.' असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्‍या आहेत.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या आधीच दिया ६ महिन्याची प्रेग्नेंट असल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली होती. दियाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी दियाने साहिल सांघासोबत २०१४ मध्ये लग्न केले होते. यानंतर दोघांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला होता.

यावर्षाच्या अनुभव सिन्हा यांच्या 'भीड' चित्रपटात ती दिसणार आहे. याबाबतची माहिती देताना दियाने म्हटले की, 'अनुभव सिन्हासोबत काम करणे मला खूप आवडते. कारण ते प्रत्येक गोष्ट अतिशय मजेदार आणि सुलभरित्या समजावून सांगतात.'

दिया मिर्झाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटापासून केली आहे. या चित्रपटातील दियाची भूमिका चाहत्यांना खूपच भावली. हा चित्रपट हिट ठरला हाेता. दियाने 'दिवानापन', 'तुमको न भूल पाएंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यासोबत ती 'थप्पड' चित्रपटामध्ये सिंगल मदरच्या भूमिकेत दिसली हाेती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT