‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटातील नवीन गाणं ‘Aari Aari’ नुकताच रिलीज झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर आणि आदित्य धर खतरनाक आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. गाण्याचे संगीत, बीट्स आणि अंदाज चाहत्यांना उत्साही करून टाकत आहेत. फॅन्ससाठी हा खास बर्थडे गिफ्ट ठरला आहे आणि प्रेक्षक या गाण्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
Dhurandhar The Revenge Song AARI AARI out now
धुरंधर २ ची मोठी चर्चा सध्या सुरु आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांचे असून त्यांच्या जन्मदिनी ‘धुरंधर २’चे पहिले गाणे ‘आरी आरी’ रिलीज करण्यात आले. गाण्यात रणवीर सिंहचा खतरनाक लूक दिसला. हे पंजाबी पार्टी एंथम सॉन्ग आहे. चित्रपटाच्या कहाणीत नवे व्हिज्युअल्स दाखवण्यात आले आहे.
धुरंधर : द रिव्हेंजच्या निर्मात्यांनी रिलीज केलेल्या गाण्यात रणवीर सिंग हमजा अली मजारीच्या अवतारात दिसून येतो. धुरंधर: द रिव्हेंजच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले असून जे बॉम्बे रॉकर्सने आरी आरीचे नवीन व्हर्जन केले आहे. हा व्हिडिओ गुरुवार, १२ मार्च रोजी ऑनलाईन रिलीज करण्यात आला. आदित्य धर यांनी या गाण्याची रिक्रिएशनची कल्पना मांडली. संगीत शाश्वत सचदेव यांचे आहे.
नवतेज सिंग रेहल (बॉम्बे रॉकर्स), खान साब, जास्मिन सँडलास, सुधीर यदुवंशी यांचे गायन असून रॅप रेबल आणि टोकन यांनी लिहिले आहे. बॉम्बे रॉकर्ससह इर्शाद कामिल यांनी या गाण्यांचे बोल लिहिले आहेत आणि संगीतकार अॅडम लुकास यांनी तयार केले आहेत.
गाण्यात मागील आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. तर रणवीर सिंग हमजा अली मजारीच्या खतरनाक अवतारात दाखवण्यात आले आहे. धुरंधर: द रिव्हेंज १९ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. एक दिवस आधी - १८ मार्च रोजी स्पेशल प्रिव्ह्यूज होणार आहे.