‘धुरंधर’ चित्रपटातील मानधन चर्चेत असून रणवीर सिंगने सर्वाधिक, म्हणजे संजय दत्तपेक्षा पाचपट जास्त रक्कम घेतली आहे. अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांनी सर्वात कमी मानधन स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
Dhurandhar Cast Fee
धुरंधर खऱ्या अर्थाने बोल्डेस्ट स्पाय थ्रीलर ठरला असून जिकडे तिकडे केवळ धुरंधरचीच चर्चा सुरु आहे. रणवीर सिहं, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांना सर्वांना कमी पैसे मिळाले आहेत. जाणून घेऊया, कुणी किती पैसे घेतले?
सोशल मीडियावर या कलाकारांच्या फीची देखील चर्चा होत आहे. हा एक ॲक्शन ड्रामा आहे. रिपोर्टनुसार, रणवीर सिंहने सर्वात जास्त फी घेतली आहे. या चित्रपटात त्याने भारतीय गुप्तहेर एजंटची भूमिका साकारली आहे. तर सारा अर्जुनला १ कोटी मिळाले आहेत. तर आर माधवन पेक्षा संजय दत्तला अधिक पैसे मिळाले आहेत.
आर माधवन अजय सान्यालच्या भूमिकेत आहे. त्याला ९ कोटी रुपये मिळाले आहेत. अक्षय खन्नाला २.५ कोटी रुपये मिळाले आहेत. अक्षय खन्ना एक क्राईम लॉडच्या भूमिकेत आहे. संजय दत्त एका पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याला १० कोटी मिळाले आहेत. तर अर्जुन रामपाल १ कोटी रुपये आहेत. पण निर्मात्यांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.
रणवीर सिंह - ३० कोटी
संजय दत्त- १० कोटी
आर माधवन - ९ कोटी
अक्षय खन्ना- ३ कोटी
अर्जुन रामपाल - १ कोटी
सारा अर्जुन- १ कोटी
आदित्य धर - चित्रपट प्रॉफिट
चित्रपटाचे बजेट सध्या २८० रुपये सांगितले जात आहे. ५ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला आहे. सारा अर्जुनने या चित्रपटातून डेब्यू केला आहे. ती साऊथ अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.