आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने जगभरात १५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 'बाहुबली २' च्या जागतिक कमाईच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. जबरदस्त ॲक्शन, खिळवून ठेवणारी कथा आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.
Dhurandhar 2 Box Office collection
सध्या मनोरंजन विश्वातील सर्वात मोठी बातमी आहे, ती म्हणजे 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने कोटींचा गेम पालटला आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाने खरोखरच इतिहास घडवला आहे.
बॉक्स ऑफिस कमाई
रणवीर सिंगचा चित्रपट जगभरात १५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर भारतात १००० कोटी रुपयांच्या 'नेट' कमाईच्या उंबरठ्यावर आहे. धुरंधर २ ने आपली ऐतिहासिक घोडदौड कायम ठेवली आहे. दोन आठवड्यांत या चित्रपटाने जगभरात हा आकडा गाठला आहे. तर भारतात ९६१ कोटी रुपयांची नेट कमाई केलीय.
आदित्य धर दिग्दर्शित 'Dhurandhar: The Revenge' चित्रपटाची दमदार कमाई बॉक्स ऑफिसवर तुफान चालली आहे. चित्रपटगृहांमधील दोन आठवड्यांनंतर, हा चित्रपट आता भारतातील कमाई १००० कोटी लवकरच गाठेल, असे म्हटले जात आहे.
भारतातील कमाई -
पहिला आठवडा : ६९० कोटी
दिवस ९ वा : ४२ कोटी
दिवस १०: ६४ कोटी
दिवस ११: ७१ कोटी
दिवस १२: २६ कोटी
दिवस १३: २८ कोटी
दिवस १४: २१ कोटी
दिवस १५: १९ कोटी
भारतातील नेट कलेकश्न : ९६१ कोटी
दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी १७७ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. सोमवारी २६ कोटी
मंगळवारी २८ कोटी
बुधवारी २१ कोटी
गुरुवारी १९ कोटी
दुसऱ्या आठवड्याची एकूण कमाई २७१ कोटी
चित्रपटाने जगभरात तब्बल १,५०१ कोटी कमावले आहेत.
उत्तर अमेरिका रेकॉर्ड: हा चित्रपट उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे, त्याने 'बाहुबली २'चा विक्रम मोडीत काढला आहे.
IPL चा परिणाम नाही: विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या IPL 2026 सीझनचा या चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही.
रणवीर सिंहसोबतच संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. आता या चित्रपटाचा 'ब्लॉकबस्टर' दर्जा आणखी अधोरेखित झाला आहे. यात परदेशातील ३६७ कोटी रुपयांच्या प्रचंड कमाईची भर घातल्यास, चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई १,५०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.