Dhinchak Pooja Wedding Instagram
मनोरंजन

Dhinchak Pooja Wedding Buzz |‘ढिंच्याक पूजा’च्या लग्नाची चर्चा रंगली; व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Dhinchak Pooja Wedding Buzz | 'ढिंच्याक पूजा'च्या लग्नाची चर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

स्वालिया न. शिकलगार

सोशल मीडिया सेन्सेशन ढिंच्याक पूजा हिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तिच्या लग्नाबाबत चर्चा रंगू लागली आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया देत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Dhinchak Pooja Wedding Buzz

नेहमी आपल्या हटके गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ढिंचक पूजा आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. 'सेल्फी मैंने ले ली आज' म्हणणाऱ्या पूजाने थेट तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

मेहंदी आणि हळदीच्या फोटोंमध्ये पूजा वधूच्या रूपात सुंदर दिसत असली, तरी तिने आपल्या जोडीदाराची ओळख मात्र गुपित ठेवली आहे. यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हे खरं लग्न आहे की एखादा प्रमोशनल स्टंट, असे नेटकरी म्हणताहेत.

ढिंच्याक पूजाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती नवरीच्या वेशात दिसतेय. तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. तर तिच्या नवऱ्याने पांढरा सूट घातला आहे. त्यावर लाल फेटा घातला आहे. पूजाने पतीचा चेहरा दाखवला नाहीये, पण लग्नाचा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं आहे की "माझ्या लग्नातील काही खास क्षण, लवकरच अजून व्हिडीओ शेअर करेन."

'सेल्फी मैंने ले ली आज', 'दिलों का शूटर', 'स्वॅग वाली टोपी' आणि 'गाडी मेरी २ सीटर' सारख्या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली. ढिंच्याक पूजाने २०१७ मध्ये रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस-११' मध्ये स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. मे २०२६ मध्ये, ढिंच्याक पूजाने आपल्या लग्नाच्या व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आलीय.

नेटकरी म्हणतात-

पूजा सध्या ३३ वर्षाची आहे. तिने नेमकं कुणासोबत लग्न केलंय, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. पूजाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी तिला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्यात. तर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी काय, हिने लग्न केलं का?, अरे हा कोण आहे ज्याला पूजासोबत लग्न करावं लागलं, अशा कमेंट्स देखील काही नेटकरी देताहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT