बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी यांनी अखेर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मौन सोेडलं आहे. धर्मेंद्र यांच्याशी लग्न करूनही वेगळं राहणं आणि सार्वजनिकपणे यावर फारसं न बोलणं, या गोष्टींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
मात्र यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, ‘प्रत्येक स्त्रीला एक पती, मुले आणि एकत्र संसार असावा असं वाटतं, पण माझं आयुष्य थोडं वेगळ्या मार्गाने गेलं. मी त्यात काही वाईट मानत नाही, दुःखी नाही. मी समाधानी आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि मी त्यांना खूप छान वाढवलं आहे. दरम्यान, सध्या धर्मेंद्र यांच्या काही भावनिक सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेकांनी असा अंदाज लावला होता की ते एकटे राहतात.
मात्र, त्यांचा मुलगा बॉबी देओल म्हणाला की, ‘पप्पा एकटे नाहीत. माझी आई प्रकाश कौर आणि पप्पा दोघंही सध्या खंडाळ्याच्या फार्महाऊसवर एकत्र आहेत. दोघंही तिथे खूप समाधानी आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970 च्या ‘तुम हसीन मैं जवान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहबद्ध होते आणि त्यांना चार मुले होती - सनी, बॉबी, अजिता आणि विजेता. धर्मेंद्र यांनी त्यांचा पहिला विवाह मोडला नाही. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा मालिनीशी 1980 मध्ये लग्न केलं.