अभिनेता धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. गेल्या 10 डिसेंबरला धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तब्येत जास्त खालावली. यानंतर त्यांच्या मृत्यूची अफवा बाहेर येऊ लागली. मृत्यू झाल्याची बातमी बाहेर येताच हेमामालिनी आणि ईशा देओल यांनी माध्यमांवर चांगलाच राग काढला. यानंतर आज सकाळी सनीनेही पापाराझ्झीना चांगलेच खडसावले आहे. (Latest Entertainment News)
पण आता हेमामलिनी यांनीही धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत अपडेट शेयर केली आहे. घरी आल्यानंतर धर्मेंद्र यांची काळजी कशी घेतली जाते आहे याबाबत त्यांनी शेयर केले आहेत. त्या म्हणतात, घरी आल्यापासून धर्मेंद्र यांची काळजी घेतली जाते आहे. पण आता सगळे देवाच्या हाती आहे.
एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांच्याबाबत बोलताना त्या म्हणतात, ‘ही वेळ माझ्यासाठी सोपी नव्हती. धरमजींची तब्येत आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांची मुले गेल्या काही दिवसांत झोपलेही नाहीत. मला अशावेळी खंबीर असणे गरजेचे आहे. आमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण मी खुश आहे की ते घरी आले आहेत. ते हॉस्पिटलमधून परत आले ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आता त्यांना त्यांच्या जीवलगांसोबत असण्याची गरज आहे. बाकी सगळे ईश्वराच्या हातात आहे.
सनी, बॉबी आणि प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र घरात त्यांच्या माणसांच्या सहवासात असावेत. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते.