धर्मवीर - २  Pudhari File Photo
मनोरंजन

Dharmaveer 2 Collection | 'धर्मवीर-२' चा नवा रेकॉर्ड , पहिल्या दिवशी इतकी कमाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मागील काही दिवसात बॉबी देओलने मराठी चित्रपट धर्मवीर २ चे पोस्टर रिलीज केले होते. यावेळी ट्रेलर लॉन्चसमयी सलमान खान पोहोचला होता. काल २७ सप्टेंबर रोजी धर्मवीर २ चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भरघोस कमाई केलीय. (Dharmveer 2 Movie )

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, १.९२ कोटींचे कलेक्शन केल्याची माहिती समोर आली होती. या चित्रपटाचे बजेट १५ कोटी रुपयांचे आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांचा बायोपिक धर्मवीरचे सीक्वल धर्मवीर २ आहे.

धर्मवीरची पटकथा प्रवीण तरडेंनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तारदे आणि श्रुती मराठे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आनंद दिघे यांचे ऑगस्ट २००१ मध्ये ठाणे येथील एका रुग्णालयात हार्ट ॲटॅकने निधन झाले होते. धर्मवीर २ मध्ये त्यांचे जीवन आणि राजकिय करिअरशी संबंधित प्रसंग पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ज्यु. एनटीआर आणि जान्हवी कपूरचा चित्रपट देवराने ७७ कोटींची ओपनिंग भारतात केली होती. वर्ल्डवाईड आकडा १०० कोटी पार झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT