पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा बहुचर्चित चित्रपट धर्मवीर-२ या चित्रपटाचं प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज ९ ऑगस्ट ठेवण्यात आली होती. परंतु, राज्यभरामध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हा चित्रपटाचे प्रदर्शनीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. "
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, 'मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, काही गावे पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू,' असे त्यांनी सांगितले.