Dhanashree Verma in golden color saree look  Instagram
मनोरंजन

Dhanashree Verma | डान्सर धनश्री वर्मा बिंदी-गोल्डन कलर साडीमध्ये, नेटकरी म्हणाले - 'ही तर पवन सिंहची डिमांड...'

Dhanashree Verma-Bhojpuri star Pawan Singh | डान्सर धनश्री वर्मा बिंदी-गोल्डन कलर साडीमध्ये, नेटकरी म्हणाले - 'पवन सिंहची डिमांड तर...'

स्वालिया न. शिकलगार

धनश्री वर्माने गोल्डन साडीतील सुंदर फोटो शेअर करत सोशल मीडियावर कहर केला आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत “पवन सिंह की डिमांड” अशी कमेंट केली आहे.

Dhanashree Verma in golden color saree look viral

मुंबई - धनश्री वर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री साडीमध्ये दिसतेय. मात्र सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भोजपुरी स्टार पवन सिंहचे नाव लिहित आहेत.

Dhanshree Verma golden saree

प्रसिद्ध डान्सर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने गोल्डन कलरच्या साडीतील काही सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांना वेड लावले असून हे फोटो काही क्षणांतच व्हायरल झाले आहेत.

ॲमेजन प्राईम व्हिडिओचा रिॲलिटी शो राईज अँड फॉलमध्ये धनश्री वर्मा दिसली होती. सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत राहते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती फूल स्लिव्हज ब्लाऊज आणि गोल्डन कलर साडीत दिसते. लांबसडक केस आणि मिनिमम मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. धनश्रीने या लूकसाठी हलका मेकअप, आकर्षक ज्वेलरी आणि ओपन हेअरस्टाईल निवडली आहे.

Dhanshree Verma golden saree

नेटकरी म्हणताहेत...

तिच्या या लूककडे पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “भोजपुरी हिरोइनसुद्धा फेल पडतील तुमच्या पुढे!” आणखी एका युजरने म्हटलं-पवन सिंहची ही डिमांड होती, तर पूर्ण तर करायलाच पाहिजे. आणखी एका युजरने लिहिलं-पवन सिंहने तिला चुकून चांगला सल्ला दिला होता.

Dhanshree Verma golden saree

धनश्री वर्मा सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या डान्स व्हिडिओज, ट्रॅव्हल पोस्ट्स आणि फॅशन लूकमुळे चर्चेत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असून प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा अक्षरशः लाईक्सचा वर्षाव असतो.

शोमध्ये धनश्री सोबत पवन सिंह

पवन सिंह देखील राईज अँड फॉलमध्ये धनश्री सोबत स्पर्धक होता. शो दकम्यान, पवन सिंहने धनश्रीला म्हटलं होतं की, ती साडी आणि बिंदीमध्ये खूप सुंदर दिसेल आणि निर्मात्यांकडे तिच्यासाठी साडी आणि बिंदी पाठवण्याची मागणी केली होती. पवन सिंहला बिहार निवडणुकीमुळे शो मधून बाहेर पडावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT