Devoleena Bhattacharjee  
मनोरंजन

Devoleena Bhattacharjee : देवोलीनाने जिम ट्रेनरसोबत गुपचूप केलं लग्न (Photos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकली आहे. देवोलीनाने काल रात्री सोशल मीडियावर हळद सोहळ्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. या दरम्यान, 'साथ निभाना साथिया' मध्ये तिच्यासोबत असणारा सहकलाकार विशाल सिंहेदखील उपस्थित होता. (Devoleena Bhattacharjee) तिच्या हळद समारंभातील फोटो पाहून चाहत्यांना लग्नाचा अंदाज आला होता. यानंतर देवोलीनाने फॅन्सना आपला ब्रायडल लूक दिला. आता तिने आपल्या पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Devoleena Bhattacharjee)

देवोलीनाने शेअर केले लग्नातील फोटोज

देवोलीनाने पती शहनवाजसोबत फोटो शेअर करत लिहिलं आहे-'हो आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की, माझं लग्न झालं आहे. जर मी दिवा घेऊनदेखील शोधला असता तरी तुझ्यासारखा मिळाला नसता. तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम…'

दोन वर्षे डेट केल्यानंतर देवोलीनाने केलं लग्न

देवोलीनाच्या पतीचे नाव शहनवाज शेख आहे. शहनवाज शेख एक जिम ट्रेनर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट जिममध्ये झाली होती जवळपास दोघांनी एकमेकांना २ वर्षे डेट केलं आहे.

ब्रायडल मेहंदी, सजली वधू

देवोलीनाने जे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती वधूच्या वेषात दिसत आहे. हातावर ब्रायडल मेहंदीदेखील दिसत आहे. हे फोटोज पाहिल्यानंतर फॅन्सना वाटत होते की, ती विशाल सिंहसोबत लग्न करत आहे. पण, तसं झालं नाही.

युजर्सना वाट आहे पब्लिसिटी स्टंट

देवोलीनाच्या ब्रायडल लूकला पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. काही जण म्हणाले की, ती हे सर्व पब्लिसिटीसाठी करत आहे. एक युजरने फोटोवर कमेंट करत लिहिलं की, 'तुम्ही असे प्रँक का करता.' तर दुसऱ्याने लिहिले, 'आशा करतो की, हे लग्न सत्य असेल.'

देवोलीनाने अनेकदा केलेत प्रँक

देवोलीनाने याआधी विशाल सिंह सोबत साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला होता. जे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की, दोघांनी साखरपुडा केलं आहे. देवोलीनाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं होतं. 'इट्स ऑफिशयल.' परंतु, काही दिवसांनंतर खुलासा झाला होता की, दोघांनी हे प्रँक आपल्या अपकमिंग म्युझिक व्हिडिओसाठी केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT