'देवमाणूस'मधून रेणुका शहाणे-सुबोध भावे भेटीला  Instagram
मनोरंजन

Devmanus Film | 'देवमाणूस'मधून रेणुका शहाणे-सुबोध भावे भेटीला

रेणुका शहाणे-सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - "देवमाणूस" हा बहुप्रतीक्षित सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचा लव फिल्म्स हा प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित "देवमाणूस" हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणाले, “देवमाणूस प्रेक्षकांना वेग वेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ सारखे उत्तम कलाकार ह्यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”

लव फिल्म्सच्या मराठी चित्रपटसृष्टीतील उपक्रमाबद्दल बोलताना, निर्माते लव रंजन म्हणाले, "महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संगीत आणि कथाकथनाने पिढ्यान पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे. मराठी चित्रपटांच्या या जगात पाऊल ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. देवमाणूस हा पहिला मराठी चित्रपट आम्ही निर्मित केला असून या मराठी परंपरेला आमची आदरांजली आहे. हा या मराठी भूमीचा आणि तिथल्या लोकांच्या भावनेचा उत्सव आहे."

निर्माते अंकुर गर्ग म्हणतात, “हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आकर्षक कथा, बारकावे आणि समृद्ध वारशाचा गौरव करतो पण सर्व काही अस्सल मुळाशी जोडून. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या कलाकार आणि तेजस यांच्या दिग्दर्शनाच्या उल्लेखनीय प्रतिभेने आम्ही एकत्रितपणे एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन देतो जो प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने गुंतवेल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT