Deool Band 2 announced  pudhari photo
मनोरंजन

Deool Band 2 | 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' ११ वर्षांनंतर 'देऊळ बंद २' ची गर्जना; प्रविण तरडेंनी जाहीर केली तारीख

Deool Band 2- लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणत आहेत "देऊळ बंद २" आता परीक्षा देवाची

स्वालिया न. शिकलगार

२०१५ मधील सुपरहीट 'देऊळ बंद' चित्रपटानंतर आता तब्बल ११ वर्षांनी त्याचा दुसरा भाग 'देऊळ बंद २' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाचे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. "आता परीक्षा देवाची" अशी कॅप्शन असलेल्या या चित्रपटात पुन्हा एकदा अध्यात्म आणि विज्ञान यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

२०१५ साली प्रदर्शित झालेला मूळचा देऊळ बंद चित्रपटाचा पुढचा भाग येतोय. अभिनेते प्रविण तरडे यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली असून एक डिजिटल पोस्टर शेअर केले आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा हा चित्रपट आहे. देऊळबंदला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यामुळे आजही "देऊळ बंद" सिनेप्रेमींचा आवडता चित्रपट आहे. आता प्रेक्षकांची पुढील भागीच प्रतीक्षा संपली आहे. देऊळ बंदचा दुसरा भाग येतोय.

देऊळ बंद २ चे पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाची एक झलक तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता परीक्षा देवाची अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्रविण तरडेंचा 'सिक्सर' लागणार?

प्रविण तरडे यांनी आत्तापर्यंत 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २' असे सलग पाच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे यशस्वी ठरले. आता 'देऊळ बंद २' हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. पोस्टरमधील भव्यता पाहता हा चित्रपट पुन्हा प्रेक्षक वर्ग खेचून आणेल, असे म्हणायला हरकत नाही.

कलाकारांची नावे गुलदस्त्यात

डिजिटल पोस्टर प्रदर्शित झाले असले तरी चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील हे अद्याप कळलेलं नाही. पहिल्या भागात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती, ती भूमिका यावेळी कोण साकारणार? आणि मुख्य शास्त्रज्ञाच्या भूमिकेत कोण असेल? यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

कधी रिलीज होणार?

आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT