काल संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला बॉम्बस्फोटाने सगळा देश हादरला आहे. लाल किल्ल्याजवळ असलेल्या कारचा स्फोट झाला. या स्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्याने देशभरात संतापाची लाट आली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींही या हल्ल्याचा निषेध करत संतांपाळा वाट करून दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते काय म्हणतात ते पाहू.
इशान आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, सुरक्षित रहा, कळवत रहा. दिल्ली या ब्लास्टच्या बातमीने अस्वस्थ आहे
तमिळगा वेत्री कझगम या पक्षाच्या एक्स हँडलवरही दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या कार स्फोटाच्या बातमीने मला अत्यंत धक्का बसला असून मनःपूर्वक दुःख झाले आहे. या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या सर्व कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. सर्व जखमी लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना
स्फोटाने मी खूप दुःखी आहे. देव या स्फोटाच्या दोषींना शोधून त्यांना कडक शिक्षा देवो. प्रार्थना
अभिनेत्री निमरत कौरनेही स्टोरी शेयर करत श्रद्धांजली वाहिली आहे
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज झालेल्या दुर्दैवी स्फोटामुळे प्रभावित असलेल्या सर्वांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एकमेकांची काळजी घेऊया आणि शांततेसाठी कटिबद्ध राहूया.