Administrator
मनोरंजन

दीपिका पदुकोनने घेतले गणपतीचे आशीर्वाद, रणवीरसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

Deepika Padukone | दीपिका पदुकोणने रणवीरसह घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दीपिका पादुकोन आई होणार आहे. तिने प्रेग्नेंसी पिरीयड एन्जॉय करत आहे. दरम्यान, तिने रणवीर सिंहसोबत सिद्धीविनायकचे दर्शन घेतले आहे. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिकाने ग्रीन बनारसी साडी नेसली होती तर पती रणवीर सिंहने कुर्ता परिधान केला होता. दोघांचा एक व्हिडिओ मंदिराच्या आतून व्हायरल होत आहे. यावेळी दीपिका पादुकोण -रणवीर सिंह बाप्पाच्या आरतीवेळी भावूक झालेले दिसले.

दरम्यान, जेव्हा दर्शनासाठी रणवीर आणि दीपिका सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले, तेव्हा दोन्ही स्टार्सचे फोटो फॅन्सनी क्लिक केले. यावेळी पॅपराझींनीदेखील गर्दी केली आणि फोटो क्लिक केले. यावेळी दीपिका पदुकोनच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचं सौंदर्य स्पष्ट दिसत होतं.

दीपिकाने गणेश चतुर्थीच्या औचित्याने बाप्पांचा आशीर्वाद घेतला. अपने प्रेग्नेंसी पीरियड को एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने मॅटरनिटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तिचे बेबी बंप पाहिल्यानंतर काही युजर्स हा अंदाज लावत आहेत की, ती जुळ्या मुलांना जन्म देईल.

video - viral bhayani insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT