मुंबई : बी टाऊनमधील फेमस जोडी दीपिका पादुकोण व रणवीर सिंह हे गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी मातापिता बनले होते. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘दूआ’ असे ठेवले होते. पण गेले वर्षभर आपल्या लेकीला पापाराझींपासून लपवून ठेवले होते. पण आज त्यांनी दिवाळीच्या मूहूर्तावर आपले मुलीसोबतचे फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दीपिका व रणवीर यांची जोडी बॉलिवूडमधील हॉट कपल आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची चर्चा होत असते. त्यांचे लग्नही अत्यंत राजेशाही थाटात झाले होते. त्यांनतर दिपीकाने गेल्यावर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. पण फोटोग्राफरच्या नजरेपासून त्यांनी मुलीला कटाक्षाने दूर ठेवले होते.
पण आज दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिकाने आपल्या इन्स्टांग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दीपिका व रणवीरच्या हातामध्ये त्यांची लाडकी हसमुख दुआ बसलेली दिसत आहे. रणवीर आपल्या मुलीला खूप प्रेमळ नजरेने पाहत असलेला दिसत आहे.
दीपिका रणवीरने इन्स्टाग्रामवरुन मुलीसोबतचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दीपिका व तीची मुलगी दुआ दोघींनी लाल आऊटफिट परिधान केला आहे ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत. दूसऱ्या फोटोमध्ये दीपिका पुजेला बसली असून दुआने प्रार्थनेसाठी हात जोडल्याचे दिसत आहेत.