Deepika Padukone Pudhari
मनोरंजन

Deepika Padukone | 'स्पिरिट'च्या वादानंतर दीपिकाचा नवीन लूक व्हायरल; जल्लोष करत फॅन्स म्हणाले-हीच खरी क्वीन!

Deepika Padukone | 'जवान'नंतर पुन्हा ॲटलीच्या बिग बजेट चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत साकारणार अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिका

पुढारी वृत्तसेवा

Deepika padukone new look in movie with Atlee

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. अलीकडेच, तिने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक ॲटली यांच्या आगामी बिगबजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे टेम्पररी टायटल 'AA22xA6' असून, दीपिकाच्या भूमिकेची झलक एका अॅक्शन पॅक्ड व्हिडिओद्वारे दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दीपिका भाल्यासह दमदार अॅक्शन करताना दिसत आहे, ज्यामुळे तिच्या भूमिकेची ताकद आणि चित्रपटाच्या शैलीबद्दल उत्सुकता वाढली आहे.

नेटीझन्स खूष

दीपिकाच्या या घोषणेनंतर, नेटिझन्सनी दीपिकाला 'क्वीन' म्हणून संबोधले आहे. एका युजरने लिहिले, "क्वीन अखेर घरात आली आहे", तर दुसऱ्याने "डॅम... हे नक्कीच धमाकेदार असेल" असे म्हटले आहे. अलीकडेच, समंथा रुथ प्रभु, मृणाल ठाकूर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या कलाकारांनीही दीपिकाच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे.

स्पेशल इफेक्ट्सचा भरपूर वापर

दरम्यान, 'AA22xA6' या चित्रपटात विशेष व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी हॉलिवूडच्या Lola VFX, Legacy FX आणि Spectral Motion यांसारख्या कंपन्यांची मदत घेतली जात आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन मोशन कॅप्चर, प्रोसथेटिक मास्क ट्रायल्स आणि 3D स्कॅनिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. दीपिका, अल्लू अर्जुन आणि ॲटली हे त्रिकुट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पेशल इफेक्ट्समुळे या चित्रपटाची आत्ताच सुपरहीट अशी चर्चा सुरू झाली आहे.

संदीप रेड्डी वांगासोबत धुसफूस

या आधी, दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याच्या 'स्पिरिट' चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अंदाजे आठ तासांची कामाची वेळ आणि इतर मागण्यांमुळे तसेच इतर अटींमुळे संदीपने तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड केली. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे.

या घडामोडींवर संदीप रेड्डी वांगा याने सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली होती. त्याने दीपिकावर विश्वासघात आणि कथानक लीक केल्याचा आरोपांबद्दल एक गूढ पोस्ट केली होती.

दीपकाचे आगामी चित्रपट

या सर्व घडामोडींमुळे दीपिका पादुकोणच्या आगामी प्रकल्पांविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'AA22xA6' या चित्रपटाच्या माध्यमातून ती एक नवीन शैलीतील आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना एक नवीन दीपिका अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, आगामी काळात दीपिका जवान 2, ब्रह्मास्त्र पार्ट 2 यांसह हॉलीवूडच्या 'द इंटर्न' या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे.

दीपिका एका चित्रपटासाठी सध्या 15 ते 30 कोटी रूपये मोबदला घेते. तिची एकूण संपत्ती 500 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT