दीपिका आणि रणवीरच्या घरी दुसऱ्यांदा परीचे आगमन 
मनोरंजन

Welcome Baby Girl | दीपिका - रणवीरच्या घरी दुसऱ्यांदा परीचे आगमन, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून चाहत्‍यांना दिली गाेड बातमी

२०२४ मध्ये झाला होता पहिली मुलगी ‘दुआ’चा जन्म , अनेक चाहत्‍यांकडून अभिनंदन

Namdev Gharal

deepika ranveer दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी शनिवारी त्यांच्या धाकट्या मुलीच्या जन्माची घोषणा इंस्टाग्रामवर पोस्टव्दारे केली. दुआ दिपीका रणवीर असे लिहलेले व एका पायाचा ठसा असलेला फोटो टाकत त्‍यांनी ही घोषणा केली. दुआ ही या जोडीची पहिली मुलगी आहे. कालच या दोघांनी जोडीने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले हाते. आज त्‍यांनी मुलीच्या जन्माची घोषणा केली आहे.

दिपीकाने टाकलेल्या पोस्टमध्ये बाळाच्या पायाचा ठसा टाकला असून "स्वागत आहे मुलीचे! 19/9/2026. दुआ, दीपिका आणि रणवीर." असे म्हटले आहे. Welcome Baby Girl अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी त्यांच्या नवजात बाळासाठी अभिनंदन संदेश आणि शुभेच्छा दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आणखी एक छोटी राजकुमारी, उत्सव साजरा करण्याचे आणखी एक कारण!

2024 मध्ये झाला होता पहिली मुलगी दुआचा जन्म

दीपिका आणि रणवीरने 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची मुलगी दुआच्या जन्माची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी लिहिले होते, 'वेलकम बेबी गर्ल. 8 सप्टेंबर 2024. दीपिका आणि रणवीर. आणि आता दुसऱ्यांदा तसेच दुसऱ्या मुलीच्या पायाचा ठसा पोस्ट करत दुसऱ्या मुलीच्या जन्माची घोषणा केली. दोघांची प्रेमकहाणी 2013 मध्ये 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केले.

क्रिती सेनन, शिल्पा राव यांनी केले अभिनंदन

रणवीर दिपीका यांनी मुलीच्या जन्माची घोषणा करताच त्‍यांच्या पोस्टवर लाईक व कमेंट पडत आहेत. अभिनेत्री क्रिती सेनन हीने अभिनंदन दूआला बहिण मिळाली अशी कमेंट केली आहे. तर गायिका शिल्पा राव हिने काँग्रेच्युलेशन असे म्हणत या दोघांचे अभिनंदन केले आहे. या त्‍यांच्या पोस्टवर अनेक चाहत्‍यांकडून अभिनंदनाच्या कमेंट होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT