पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो शेअर होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. इन्स्टावर चाहते या फोटोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दीपिका पदुकोणने गोंडस मुलीला जन्म दिला. ही न्यूज रणवीर सिंहने सप्टेंबरमध्ये शेअर केली होती. पण बाळाचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता. पण चाहते बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. आता दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीरने त्यांच्या घरातील लक्ष्मीचा फोटो शेअर केला आहे. खरंतर, दोघांनी शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मुलीचा फोटो शेअर केला होता. यामध्ये बाळाचा चेहरा दिसत नसला तरी तिचे फक्त पाय दिसत आहेत.
फोटोत बाळाने लाल रंगाचा पारंपरिक पोशाख घातल्याचे दिसत आहे. याशिवाय दोघांनीही आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, 'दुआ पदुकोण सिंह. दुआ म्हणजे प्रार्थना. कारण ते आपल्या प्रार्थनेचे उत्तर आहे. आमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर.
या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जिथे आलिया भट्टने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. डायना पेंटीनेही टिप्पणी केली, खूप सुंदर. दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री दीपिका प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रणवीर अनेकवेळा मुलाखतींमध्ये दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसला होता.