पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण हिने शाहरूख खानच्या ओम शांती ओम' या सिनेमातून बॉलीबुड पदार्पण केले होते. या सिनेमाच्या यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही; पण इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष आणि टीकेचा सामना करावा लागला होता. 'ओम शांती ओम' या चित्रपटानंतर माझ्यावर खूपच टीका झाली होती, असा खुलासा तिने केला आहे.
एका मुलाखतीव दीपिका म्हणाली की, माझा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' प्रदर्शित झाला, त्यावेळी माझ्याबाबत खूपच वाईट बोलले गेले; पण त्यातील एक वाईट टिप्पणी अशी होती, ज्यामुळे मी माझ्या स्वतःवर काम करण्याचे ठरवले. यामध्ये माझे उच्चार, शब्द, प्रतिभा आणि क्षमतेवर बोलले गेले होते.
नकारात्मकता काहीवेळा चांगली गोष्ट असते, यामुळे तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवू शकता. तुमच्यावर टीका होते, त्यावेळी तुम्ही काय करता आणि ते किती सकारात्मकपणे वागता हे महत्त्वाचे आहे.
तसेच स्वतःवर प्रेम करणे खूपच महत्त्वाचे आहे, जे लोक स्वतःवर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्याकडे लोक वाईट नजरेने बघतात, जर एखादी व्यक्ती आठवडाच्या शेवटी काम करायचे नाही, असे ठरवते, त्यावेळी लोकांना असे वाटते की, ती तिच्या कामाबाबत प्रामाणिक नाही की, आणि ही गोष्ट मला खूपच विचित्र वाटते. चांगले काम करण्यासाठी तुम्हाला विश्रांतीची गरज असते. दीपिकाच्या 'सिंघम अगेन' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.