दीपिका पदूकोण हे नाव सध्या चर्चेत आहे ते आगामी रिलीजमुळे नाही तर सिनेमातून बाहेर पडण्यामुळे. दीपिका आता आगामी बहुचर्चित सिनेमा कल्की 2898 एडी मध्ये दिसणार नाही. वैजयंती मुव्हिजने एक्स पोस्ट करत याबाबत स्पष्ट केले आहे. (Latest Entertainment News)
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही आता घोषणा करत आहोत की दीपिका पदूकोण आगामी Kalki2898AD च्या सिक्वेलचा हिस्सा असणार नाही. अत्यंत विचारकरून आम्ही या निर्णयाबाबत आलो आहोत. पहिल्या सिनेमाच्या निर्मितीच्या मोठ्या प्रवासानंतरही आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही. Kalki2898AD सारखा सिनेमा कमिटमेंट आणि त्याहीपेक्षा आधिक समर्पणाच्या लायक आहे. आम्ही त्यांना भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा देतो.’
काय आहे दीपिका सिनेमा सोडण्याचे कारण?
यावेळी दीपिकाने या सिनेमासाठी 25 कोटी रुपये फी मागितली होती. तसेच दीपिकासोबत येणाऱ्या 25 क्रू मेंबरसाठीदेखील भली मोठी रक्कम आकारली गेली. पहिल्या भागापेक्षा दीपिकाने 25% फी वाढवली. याशिवाय तिचे शूटिंगची वेळ केवळ 7 तासच असावीत अशी मागणीही केली. निर्मात्यांनी तिला त्या बदल्यात आरामदायी व्हॅनिटी वॅन देण्याची घोषणा ही केली. तसेच तिच्या 25 टीममेंबरसाठी चांगल्या हॉटेलची मागणी ही केली गेली. यामुळे दीपिका आणि निर्मात्यामध्ये बिनसल्याचे बोलले जात आहे.
पहिल्या भागात काय होती दीपिकाची भूमिका?
या सिनेमाच्या पहिल्या भागात दीपिकाने सुमती नावाच्या गर्भवती महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटनी सारखे कलाकार आहेत. या सिनेमाने रिलीज दरम्यान 100 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता.
संदीप वांगासोबतही झाला होता वाद
दीपिका पदूकोणने यापूर्वीही वेळ जुळत नसल्याच्या कारणावरून संदीप रेड्डी वांगाचा स्पिरीट हा सिनेमा सोडला होता. त्यात ती प्रभाससोबत दिसणार होती. यावेळी संदीपनेही दीपिकावर निशाणा साधत अप्रत्यक्ष रूपात पटकथेचा काही भाग लिक करण्याचा आरोप केला होता.