who is Deepika Padukone's ex-boyfriend Muzammil Ibrahim
मुंबई - नुकताच संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटामुळे दीपिका पादुकोण चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा होतेय. कारण आहे मुजम्मिल इब्राहिम. मुजम्मिलने दावा केला आहे की, दीपिका पादुकोन त्याची गर्लफ्रेंड होती आणि दोघांनी जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. मुजम्मिलने कोणते मोठे खुलासे केले आहेत, नेमकं प्रकरण काय आहे पाहुया.
तिचा लाईफ पार्टनर रणवीर सिंह असला तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं आहे. एकदा करण जोहरच्या शोमध्ये स्वत: दीपिका पादुकोणने खुलासा केला होता की, ती तिचा असा लाईफ पार्टनर शोधत होती, जो तिच्यासाठी योग्य असेल. दरम्यान, मुजम्मिलने दावा केला की, दीपिका आणि तो रिलेशनशीपमध्ये होते. सिद्धार्थ कन्नन सोबतच्या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत.
दीपिका ग्लॅमरस जगात येण्यापूर्वी तो तिला ओळखत होता. त्या आठवणी सांगताना मुजम्मिल म्हणाला, "आम्ही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो...ती खूप आत्मविश्वासी होती. कारण ती प्रकाश पादुकोणची मुलगी आहे, म्हणून तिलो ओळखथ होते."
मुजम्मिल इब्राहिम एक अभिनेता आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडल म्हणून केली होती. जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जन्मलेला मुजम्मिल मॉडल देखील आहे. त्याचा जन्म २५ ऑगस्ट, १९८६ झालाय. २००३ मध्ये त्याने ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा जिंकली होती.
त्याने सांगितलं की, तेव्हा तो एक स्टार होता. पण दीपिका कॅमेरासमोर आली नव्हती. तो म्हणाला, आता ती एक सुपरस्टार आहे. प्रत्येक जण तिली ओळखतो. मला कुणीही ओळखत नाही. मी खूप मोठा फॅन आहे. मला तिचे चित्रपट पाहायला आवडतात. ती एक सुंदर महिला आहे. तिचे काम खूप चांगले आहे, पण सत्य हेचं आहे."
मुजम्मिलने सांगितलं, "तिच्या लग्नापूर्वी आम्ही कधी-कधी बोलत होतो." पण २०१८ मध्ये रणवीर सिंहशी तिच्या लग्नानंतर मैत्री संपुष्टात आली.
मुजम्मिलने प्रेमळ आठवणी सांगितल्या. दीपिका सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना तो म्हणाली की, 'तेव्हा आम्ही मुले होतो. आम्ही पावसात रिक्षातून डेटवर जायचो. ते क्षण खूप गड होते. तेव्हा माझ्याकडे अधिक पैसे होते. कारण त्यावेळी मी ज्यादा कमवयचो. मग मी एक कार खरेदी केली, ते पाहून ती खूप खुश होती. या गोष्टी स्मरणीय आहेत. तेव्हापासून मी रिक्षातून डेटवर गेलेलो नाही. आम्ही खूप खुश होतो.'
कधी पैसे नसतानाही डीजे ते गाणे वाजवायचा, जे दीपिकाला आवडायचं. कारण मी डीजेचा मित्र होतो. दीड तास फक्त तेच गाण वाजवलं. कारण त्यादिवशी दीपिकाचा वाढदिवस होता."
मुजम्मिलने स्पष्ट केलं की, सुरुवातीला हे नाते तिने पुढे नेलं होतं, पण नाते संपुष्टात आलं ते त्याच्यामुळेचं.