दीपिका पदुकोण मंगळसूत्र न घालताच सिद्धिविनायक मंदिरात, लोक म्‍हणाले... File Photo
मनोरंजन

Deepika Padukone : दीपिका पदुकोण मंगळसूत्र न घालताच सिद्धिविनायक मंदिरात, लोक म्‍हणाले...

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

दीपिका पदुकोण ही लवकरच आई होणार आहे. तीच्या कुटुंबियांसोबतच तिच्या चाहत्‍यांना देखील गोड बातमीची उत्‍सुकता लागुन राहिली आहे. डिलिवरीसाठी हॉस्‍पीटलमध्ये दाखल होण्याआधी दीपिका पदुकोण ही तीचा पती रणवीर सिंह हे दोघे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. जिथे त्‍यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले. मात्र या दरम्‍यान दीपिका ही मंगळसूत्र गळ्यात न घालताच आल्‍याने याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.(Deepika Padukone)

दीपिका पदुकोणचे सिद्धिविनायक मंदिरात गेल्‍याचे फोटो सोशल मीडियावर आल्‍यावर काही युजर्सनी दीपिकाने मंगळसूत्र न घातल्‍याने तिला चांगलेच टीकेचे धनी बनवले. ती मंगळसूत्र न घालताच मंदिरात का गेली असा अनेकांनी प्रश्न उपस्‍थित केला. तर एका यूजरने लिहिले की, कल्‍पना करा की, इतका पैसा कमावल्‍यानंतरहीा यांना मंगळसूत्र खरेदी करता आले नाही. खास करून मंदिरात दर्शनासाठी जात असतानाही.

एका यूजरने दीपिकाचा बचाव करताना म्‍हटलंय की, जर कोणाला परंपरांचे पालन करायचे आहे किंवा नाही हा ज्‍याचा त्‍याचा किंवा त्‍यांच्या कुटुंबावर अवलंबून आहे. इंटरनेटवर दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्‍वत:च्या कामात लक्ष द्या.

दीपिका पादुकोण तीच्या पहिल्‍या आपत्‍याला जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती झाली आहे. तीने फेब्रुवारी महिन्यातच गर्भवती असल्‍याचे जाहीर केले होते. नुकतेच तिने प्रेग्‍नेंसी फोटोशूट देखील केले हाेते. ज्‍यामध्ये ती आपले बेबीबंप दाखवताना दिसली होती. दीपिका आणि रणवीर लवकरच सिंघम चित्रपटातही दिसणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT