'रविका' नाव कसं वाटलं? दीपवीरच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवलं नाव  Deepveer
मनोरंजन

'रविका' नाव कसं वाटलं? दीपवीरच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवलं नाव

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह घरी परीचे आगमन झाल्याने आनंदात आहेत. दीपिकाने रविवारी एका गोंडस कन्येला जन्म दिला आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लेक झाल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर या जोडप्याने लेकीचे नाव 'रविका' असे ठेवावे, असे सूचविले आहे.

सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या लेकीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो खरोखरच दीपिकाच्या बाळाचेच आहेत काय, असा सवाल विचारला जात आहे. पण, हे फोटो दीपिका आणि तिच्या बाळाचे नसल्याचे समोर आले आहे. व्हायरल फोटो एआयद्वारे तयार करण्यात आले आहेत.

व्हायरल फोटोत दीपिका ही रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसत असून, तिच्या मांडीवर बाळ देखील दिसत आहे. आता अन्य जोडप्यांप्रमाणेच चाहते त्यांना दीपवीर म्हणतात. दीपिकामधील दीप आणि रणवीरचा वीर या शब्दाचा वापर करून दीपवीर नाव तयार केले आहे. पण, आता या हॅशटॅगचा ट्रेंड जोडप्याने मुलीचे नाव ठेवताना फॉलो करायला नको, अशी चाहत्यांच इच्छा आहे. आता अनेक लोकप्रिय जोडप्यांनी तसे केले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे, विराटमधील 'व' आणि अनुष्कातील 'का' हे अक्षर घेऊन तिचे नाव ठेवण्यात आले. आता दीपिका आणि रणवीर आपल्या लेकीचे नाव काय ठेवतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT