दर्शन रावलचे लग्नामधील फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.  Darshan Raval InstaGram
मनोरंजन

गायक दर्शन रावलने गुपचूप उरकले लग्न! लहानपणीच्या मैत्रीणीला बनवले जीवनसाथी

Darshan Raval | लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो व्हायरल

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणारा गायक दर्शन रावल (Darshan Raval) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याचे अन् त्याच्या पत्नीचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. रिपोर्ट्सनुसार, धरल सुरेलिया त्याची सर्वात चांगली मैत्रीण होती. या गायकाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Darshan Raval | दर्शनची पत्नी धरल सुरेलिया कोण आहे?

दर्शनच्या लग्नानंतर त्याचे चाहते त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत. दर्शनची पत्नी धरल सुरेलिया एक आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे. धरलने बॅबसन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी उद्योजकता विषयात एम.एससी पदवी प्राप्त केली. ती बटर कॉन्सेप्ट्स नावाच्या डिझाइन फर्मची संस्थापक देखील आहे. ही माहिती तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून मिळाली आहे.

फोटोंमध्ये दोघेही गोंडस दिसत आहे

लग्नाच्या या खास प्रसंगी दर्शन आणि त्याची पत्नी धरल सुरेलिया दोघेही खूप गोंडस दिसत होते. लाल रंगाच्या पोशाखात धरल खूप सुंदर दिसत आहे. तिच्या लेहेंग्यावरील सुंदर भरतकामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गायकाच्या पत्नीने चांदीची अंगठी घातली होती ज्यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली. खास गोष्ट म्हणजे धरलने दोन दुपट्टे घातले होते, जे अतिशय सुंदर संयोजनाने सजवलेले होते.

Darshan Raval | व्हायरल फोटोंवर चाहत्यांचा प्रतिक्रियांचा पाऊस

दर्शन रावलच्या लग्नाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यांच्या लग्नाचा फोटो अचानक समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तथापि, सर्व चाहते आवडत्या स्टारचे खूप खूप अभिनंदन करत आहे. दर्शनचा आवाज आणि त्याची गाणी नेहमीच लोकांमध्ये लोकप्रिय राहिली आहेत. त्यांना बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या गायकांपैकी एक मानले जाते, ज्यांनी त्यांच्या आवाजाने अनेक हिट गाणी दिली आहेत. दर्शनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने जब तुम चाहो, मैं वो चांद, खेंच मेरी फोटो, बेखुद, ओधनी, तेरे शिवा जग में यासारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT