मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ध्रुवकडून ३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच ही कारवाई एनसीबीने (नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो) केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ताहिल मार्च २०२० पासून मुजम्मिल अब्दुल रहमान शेख नावाच्या एका ड्रग्ज धारकांच्या संपर्कात होता. मुजम्मिल याच्याकडून त्याने अनेक वेळा ड्रग्ज मागवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने या प्रकरणातील आरोपी मुजम्मिल अब्दुल रहमान शेख याला काही दिवसांपुर्वी अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांने ध्रुवला ड्रग्ज पुरवल्याचे मान्य केले होते. यानंतर मुंबई पोलिसांच्या एमसीबी पथकाने काल बुधवारी (५ एप्रिल) रोजी ध्रुवच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. या कारवाईत त्याच्याजवळील ३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
वाचा : 'छिचोरे' फेम अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन
याशिवाय पोलिसांना मुजम्मिल यांच्या फोनची तपासणी केल्यानंतर ध्रुव ताहिल आणि मुजम्मिल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. तसेच ध्रुव ताहिलने मुजम्मिल याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या घटनेचा पुढील तपास एनसीबीचे पोलिस अधिकारी करत आहेत.
वाचा : 'बुर्ज खलिफा'वर भारताची मिया खलीफा म्हणताच 'या' अभिनेत्रीचा संताप अनावर!
दरम्यान, ध्रुव ताहिल अटकेबाबत अभिनेता दिलीप ताहिल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.