Haq Movie Teaser Pudhari
मनोरंजन

Haq Teaser: देशाला बदलवणाऱ्या कोर्ट केसची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत इम्रान हाश्मी आणि यामी गौतम; जाणून घ्या

शाहबानो यांचा हा लढा आता पडद्यावर दिसणार आहे

अमृता चौगुले

देशाला लक्षात राहिलेला आणि एक उदाहरण बनलेली कोर्ट केस म्हणजे शाहबानो खटला. एका मुस्लिम महिलेला या केसने पोटगी मिळवण्याचा अधिकाराबाबत आणि मानवी मूल्यांबाबत नवे प्रश्न उभे केले होते. शाहबानो यांचा हा लढा आता पडद्यावर दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. या सिनेमात यामी गौतम शाहबानोच्या भूमिकेत दिसते आहे. तर इम्रान हाश्मी मोहम्मद अहमद खान म्हणजेच शाहबानोच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा खटला देशातील बहुचर्चित खटल्यांपैकी एक समजला जातो. (Latest Entertainment News)

जिग्ना व्होरा यांच्या 'बानो : भारत की बेटी' या पुस्तकावर हा सिनेमा बेतला आहे. चार दशकांपूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद आजही भारतीय समाजमनावर उमटताना दिसतात. या सिनेमात यामीच्या दमदार अभिनय दिसून येतो आहे. टीजरच्या सुरुवातीला पती-पत्नी मधील मधुर संबंध दिसून येतात. पण संबंध कटू त्यावेळी बनतात ज्यावेळी या दोघांमध्ये वाद सुरू होतात. हे पुढे जाऊन एका मोठ्या खटल्याचे स्वरूप घेतात.

कधी रिलीज होणार हा सिनेमा?

हा सिनेमा 7 नोव्हेंबरला जगभरात रिलीज होत आहे.

काय आहे शाहबानो खटला?

देशाच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पायावर या खटल्याने मोठा परिणाम केला होता. एप्रिल 1978 ला इंदौरला एक खटला दाखल झाला होता. शाहबानो ने आपला घटस्फोटीत नवरा मोहम्मद अहमद खानने पोटगीसाठी अर्ज केला होता.या दोघांना पाच मुले आहेत. खटला दाखल झाला तेव्हा शाहबानोचे वय 59 होते. त्यावेळी कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉं बोर्डाच्या आदेशाला धुडकावून लावत शाहबानोचा पोटगीचा अर्ज मंजूर केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT