"अत्‍यंत वेदनादायी..." : दिया मिर्झाच्‍या व्‍हिडिओवर हायकोर्टने मुंबई महापालिकेला कोणता आदेश दिला? file photo
मनोरंजन

"अत्‍यंत वेदनादायी..." : दिया मिर्झाच्‍या व्‍हिडिओवर हायकोर्टने मुंबई महापालिकेला कोणता आदेश दिला?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दीया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्याचा हायकोर्टाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

controversy on dia mirza pollution free diwali appeal hc expresses deep pain asks bmc to re upload her video

पुढारी ऑनलाईन : बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानातून बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचा व्हिडिओ हटवण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दीया मिर्झाचा हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्याचा सल्ला हायकोर्टाने दिला आहे.

बॉम्बे हायकोर्टाने म्हटले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानातील अभिनेत्री दीया मिर्झाचा व्हिडिओ हटवावा लागला, ही कारवाई त्रासदायक आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि पक्षाचे प्रमुख अमित साटम यांनी या अभियानात दीया मिर्झाच्या सहभागावर आक्षेप घेतला होता.

हायकोर्टाने सुचवले की, संविधानावरील लोकांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी अभियानातील हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करणे हा आदर्श निर्णय ठरेल. मुंबई शहर एकत्र राहण्याच्या भावनेवर आधारलेले आहे. त्यामुळे कोणत्याही अनुचित टिप्पणीमुळे या सामाजिक सलोख्याला धक्का बसता कामा नये.

भाजप नेत्यांची नावे न घेता हायकोर्टाने म्हटले, "महापालिकेच्या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन मदत करणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल ज्या लोकांनी टिप्पणी केली, त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. फटाके फोडल्यामुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश होता."

न्यायालयाने पुढे म्हटले की, आमच्या मते, BMC ने अत्यंत प्रभावी पावले उचलली होती. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सेलिब्रिटींनी एकत्र राहण्याचा संदेश दिला होता. एवढ्या गंभीर भावनेतून एखादे काम केले जात असताना त्यात गटबाजीला कोणतेही स्थान असता कामा नये, असा आमचा ठाम विश्वास आहे.

हायकोर्टाने BMC ला दीया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करणे हा आदर्श निर्णय ठरेल, असे सांगितले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय BMC वर सोपवण्यात आला आहे.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांनी म्हटले, "आम्ही आदेश देतो तेव्हा त्यात एखादी व्यक्ती प्रचारासाठी पात्र नाही, असा कोणता नियम असतो का? एखादी व्यक्ती स्वतःहून पुढे येत असेल आणि नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला फटकारणार आहात का? अशा प्रकारची संकुचित विचारसरणी आम्ही स्वीकारू शकत नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT