मनोरंजन

ही दोस्ती तुटायची नाय! ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत अनुभवा ‘सत्या आणि बलमामा’ची जिगरी दोस्ती

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेतील 'सत्या आणि बलमामा' यांची मैत्री जणू करण-अर्जुन, जय-वीरुच. मैत्री म्हंटलं की "ही दोस्ती तुटायची नाय" असं आपसूक सगळ्या वाटलंच पाहिजे. जसं की 'करण अर्जुन', 'राम लखन', 'जय वीरु' ही मित्राची जोडी जशी लोकप्रिय आहे तशीच आता आणखी एक जोडी प्रेक्षकांच्या मनात आणि घरात स्थान निर्माण करणार आहे आणि ती जोडी आहे 'सत्या आणि बलमामा' यांची.

या मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहेच. पण त्याचबरोबर फ्रेंडशिप गोल सेट करणारी मित्राची जोडी देखील पाहायला मिळणार आहे. सत्या आणि बलमामा हे अगदी जिगरी दोस्त, एकमेंकासाठी दुनियेशी दोन हाथ करणारे मित्र प्रत्येक सीनला काय धमाल करतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

कॉन्स्टेबल मंजू सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता पाहता येईल.

SCROLL FOR NEXT