'कॉन्स्टेबल मंजू' मध्ये दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे Instagram
मनोरंजन

Constable Manju : दहीहंडीमध्ये मंजूच्या शौर्याने तात्या साहेबांच्या उत्सवात गोंधळ!

तात्या साहेबांच्या दहीहंडीने घेतले अनपेक्षित वळण: मंजूचे धाडस पाहाच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सन मराठीची लोकप्रिय मालिका 'कॉन्स्टेबल मंजू' मध्ये दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे! या दहीहंडीचा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक रोमांचक असणार आहे ज्यात मंजू, जी साधारणपणे तिच्या नेभळट स्वभावासाठी ओळखली जाते, ती पहिल्यांदाच गुंडांना सामोरे जाते. हा संपूर्ण भाग बाहेर शूट केला गेला आहे. या तुफानी भागात एका खऱ्या दही हंडी गटाचा समावेश असून ज्यामध्ये सत्याही हंडीच्या थरावर चढून हंडी फोडतो. इतक्यात मंजूवर हल्ला होतो.

हा धक्कादायक प्रसंग प्रेक्षकांना नक्कीच भावुक करणार आहे, जो या कथेतल्या खोल नात्यांचे आणि तीव्र नाट्याचे प्रदर्शन करून देणार आहे. अगदी आनंदाने भरलेला दहीहंडीचा उत्सव, हा एका क्षणात गंभीर होतो. या विशेष भागात असणारा आशय प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

आता मंजू जगणार की मरणार असा पेच निर्माण होतो. दहीहंडीच्या उत्सवात नक्की काय होतं ते पाहण्यासाठी 'कॉन्स्टेबल मंजू - गोपाळकाला विशेष' २६ ते ३१ ऑगस्ट संध्याकाळी ८:०० वाजता पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT