मनोरंजन

अभिनेत्री शर्लिन चोप्राला तूर्तास दिलासा

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या अभिनेत्री शर्लिन चोप्राने उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी दखल घेत सोमवारपर्यंत शर्लिनवर कोणतीही कारवाई करू नका, असे आदेश पोलिसांना देत याचिकेची सुनावणी 22 फेबु्रवारीपर्यंत तहकूब ठेवली.

अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण उघड झाले. त्यानंतर अधिक तपासात अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे उघडकीस आले. यूकेतील एका कंपनीने शर्लिन चोप्रा हिच्याशी अश्लील चित्रपटनिर्मितीबाबत करार केला होता. पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करताच अटक टाळण्यासाठी शर्लिनने अ‍ॅड. चरणजीत चंदरपाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकेवर शुक्रवारी सायंकाळी उशिरा न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT