ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहोचलेल्या कमिडियन सुनील पाल याला नुकतेच एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. सुनीलचे काही लोकांनी अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पण, सुनीलची किडनॅपर्सच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली आहे. यानंतर सुनीलची पत्नी सरिता आणि सुनीलने यावर भाष्य केले आहे. सरिता म्हणाल्या की, सुनील घरी मुंबईत परतले आहेत. मी पोलिसांना अपहरणकर्त्यांची माहिती दिली आहे. पोलिस या प्रकरणात आम्हाला सहकार्य करत आहेत. सुनील आता पूर्णपणे ठीक आहेत. आम्ही लवकरच याबाबत सविस्तर भाष्य करू.
पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही या विषयावर उघडपणे बोलू. सुनीलचा या प्रकरणावर भाष्य करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो म्हणाला की, नमस्कार, मी सुनील पाल ! माझे २ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं; पण मी आता पूर्णपणे सुरक्षित आहे. मी त्या संकटातून बाहेर आलो आहे. तुमच्या सर्व प्रश्नांना मी लवकरच उत्तर देईन, सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोचत आहे. त्यामुळे मी आता एकदम ठीक आहे.